नवी दिल्ली | मोदी सरकार विरोधात प्रथमचकाँग्रेससह सर्व विरोधक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एकत्र येत मोदी सरकारविरोधात क्रमक पवित्रा घेतला होता. संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र आल्यावर आता ही एकजुट कायम राखत भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे.
काँग्रेसची विचारधारा आणि यूपीएतील घटक पक्ष तसेच समविचारी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बैठक घेणार आहेत. या बैठकीत काँग्रेस प्रणित राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीवर येत्या २० ऑगस्ट रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समविचारी विरोधी पक्षांचे नेते, भाजप विरोधी पक्षांचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा बैठकीत उपस्थित असणार आहेत.