पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग,

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग,

कोविशील्ड लसीमुळे संपूर्ण जगभरात नवलेली पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागलेली आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे. ही आग आता चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित आहेत. सुदैवाने ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती होणारं ठिकाण सुरक्षित असल्याचे सीरमकडून सांगण्यात येत आहे.

मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: