“A फॉर आफताब अन् A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकच” सुशांत सिंह प्रकरणावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले होते. या ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांहीही आता या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंनी नार्को चाचणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काल राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. हेच राहुल शेवाळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. उद्धव ठाकरेंचे लाडके होते. जेव्हा त्यांच्याच किचन कॅबिनेटमधील एक खासदार बाहेर येऊन सांगतो आहे, की रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंहमध्ये ४४ कॉल झाले. त्यांच्यात AU म्हणजे आदित्य ठाकरे आहे, तर याची चौकशी झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.

आतापर्यंत आम्ही जे बोलत होतो, त्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. A फॉर आफताब आणि A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकसमान झालं आहे. आजही दिसा सानियानच्या मृत्यूची केस मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, नेमकं ८ आणि ९ जूनच्या रात्री काय झालं? कशामुळे सुशांतसिंहची हत्या करण्यात आली. रिया चक्रवर्तीची या प्रकरणात काय भूमिका आहे? या प्रकणात तपास अधिकारी दोनदा का बदलले गेले? या सर्व गोष्टी उजेडात येणं गरजेचे आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्कोटेस्ट करावी”, अशी मागणी त्यांनी केली.

Team Global News Marathi: