कर्तृत्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, शेलारांचे पवारांसमोर सूचक वक्तव्य

ग्लोबल न्यूज : जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कतृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात भाजप नेते आशिष शेलार यांनी कतृत्वान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, या भावनेला समर्थन असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांना भावी मुख्यमंत्री संबोधले होते. त्यावर शेलार यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, यावेळी आमदार आशिष शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी आशा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा समर्थन असू शकते,” असं शेलार यांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: