दिल्लीचे उदाहरण देत मनपा आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना केले कळकळीचे आवाहन

दिल्लीचे उदाहरण देत मनपा आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना केले कळकळीचे आवाहन

ग्लोबल न्यूज: कोरोनाची साथ गेल्याचे समजून बेफिकीरपणे वावरणाऱ्या मुंबईकरांसाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिल्लीमध्ये कोव्हिडच्या संसर्गमुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीचे वर्णन करणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ‘स्वतःला जपा आणि कायजी घ्या’ असे आवाहन आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना केले आहे.

कोव्हिड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या शाहिद भगतसिंह ट्रस्टच्या दोन कामगारांचा व्हिडिओ चहल यांनी शेअर केला आहे. दिवाळीनंतरचा हा व्हिडिओ आहे. दिवाळीच्या नंतर दिल्लीतील करोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली असल्याचं हे दोन स्वयंसेवक सांगत आहेत. उपचारांसाठी लोकांना बेड मिळत नाहीत.

काही महिन्यांपूर्वी इटलीमध्ये जी स्थिती होती, ती स्थिती आज दिल्लीत आहे. मृतांचे केवळ रुग्णालयातील आकडे बाहेर येत आहेत, पण घरात क्वारंटाइन असलेल्यांपैकी अनेकांचे बळी गेले आहेत, असे हे स्वयंसेवक सांगताना दिसत आहेत.

आयुक्त चहल यांनी याच व्हिडिओचा दाखल देत मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या दिल्लीत दररोज परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. त्यामुळे ‘नो मास्क नो एन्ट्री’हे तत्वच आपल्या सर्वांना कोविडपासून वाचवू शकतं. त्यामुळं मास्क वापरण्याचं महत्त्व आपण सर्व नागरिकांना पटवून देऊ करूया आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवूया’, असं आवाहन चहल यांनी केलं आहे. आपण हे करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: