राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांविरोधात घोटाळ्याचे प्रकाराने बाहेर पडताना दिसून येत आहे. त्यातच आता आणखी एका राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव घोटाळ्याप्रकरणी पुढे आले आहे. आमदार अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह १६ जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आमदार अनिल भोसले यांच्यासह ७ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या ४९६ कोटी ४४ लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात ८ हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं आहे.
पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची ४९६ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.