७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 जानेवारी) 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी पगडी परिधान केली.प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे गेले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पगडीनं अनेकांचे लक्ष वेधले असून त्यांच्या पेहराव्याची जोरदार चर्चा आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास पेहराव करतात. नरेंद्र मोदी अनेक वेळा विशिष्ट प्रदेशाचा पारंपारिक पोषाख परिधान करतात. यंदा 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी बहुरंगी राजस्थानी पगडी, क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी खास पेहराव करतात. गेल्या वर्षी, प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएम मोदींनी केलेल्या पोशाखात उत्तराखंड आणि मणिपूरच्या संस्कृतीची झलक दिसत होती. उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी आणि मणिपूरचे लीरम फी स्टोल त्यांनी परिधान केली होती. मोदींच्या या पेहरावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले.

Team Global News Marathi: