“७ मार्च नंतर दिशा सलीयन प्रकरणाचा उलगडा होईल” भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अत्यंत खळबजनक आरोप केले होते.त्यातच आज सकाळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही दिशा सालियन मृत्यू प्रकरणी ट्विट करत सचिन वाझे यांच नाव घेतलं होतं. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा गौप्टस्फोट करत दावाही केला आहे. ७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा सर्व पुरावे तयार आहेत. सात मार्च नंतर दिशा सलीयन प्रकरणाचा उलगडा होईल.

कोणाकोणाचा सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होईल असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. इतकंच नाही तर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठीच सर्व फडफड आणि शिवराळ भाषा सुरू असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या या ट्विटनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे याचा काही संबंध आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दिशाला रात्री तिच्या मृत्यूच्या दिवशी काळ्या रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे अशी खळबळजनक माहिती आमदार राणे यांनी दिली होती.

Team Global News Marathi: