काय सांगता | पुण्यातील लग्न सोहळ्यात थेट बारबालांचा धांगडधिंगा

 

पुणे | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोना नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे.अशात पुण्यात कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत लग्न सोहळा पार पडला आहे. येथील एका लग्न सोहळ्यात चक्क बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संतापजनक प्रकार पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या वडारवाडी परिसरात घडला आहे. या लग्नाला मोठ्या संख्येनं नागरिक हजर होते. घरासमोर टाकलेल्या मंडपात काही बारबाला नाचवल्या आहेत. लग्नासारख्या शुभ समारंभात अशाप्रकारे बारबाला नाचवल्याने परिसरात हा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर काही नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे.

या व्हिडीओत काही बाराबाला घरासमोरील मंडपात विचित्र हावभाव करत डान्स करताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर उपस्थित काही तरुण बारबालांसोबत हिडीस डान्स करत आहेत. यावेळी काहीजण बारबालांना पैसे देताना देखील दिसून आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत असून सदर घटनेची निंदा करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: