कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली महत्वाची बैठक

पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत राज्यात वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्वाच्या मंत्रयंबरोबर कोरोना संदर्भात बैठक बोलावली आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे सर्व राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
व्हिडोओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार्‍या या बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीला सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनचे काही निर्बंध लादण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांनीही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, असे संकेत दिले होते.

राज्यात कोरोनाचे रुग्ण मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा सोमवारी एकाच दिवसांत चार हजारापेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. यामुळे प्रशासन काही कठोर पावले उचलण्याच्या विचारात दिसून येत आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसा सूचक इशारा देखील दिला.

Team Global News Marathi: