23 एप्रिल पर्यत मला फोन ही करू नको प्रशांत परीचारकांनी संजय मामांना बजावले

टीम ग्लोबल न्यूज

पंढरपूर :  मी पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना सांगितले होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कोणीही मतदान करू नये ” मी सडेतोड आणि स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे मला आत एक आणि बाहेर एक असे चालत नाही” ज्यांना उघड विरोध करावयाचा असेल त्यांनी उघडपणे विरोध करावा असे सांगून संजय मामा माझा जवळचा दोस्त असला तरी 23 एप्रिल नंतर बघू , तोपर्यंत मला फोन सुद्धा करू नको.” असे मी मामाला सांगितले आहे. निंबाळकर, फडणवीस आणि मोदी अशी आपली लाईन क्लिअर आहे. असे स्पष्ट मतआमदार प्रशांत परिचारक यांनी मांडले.


माढा लोकसभा मतदारसंघातील खेड भाळवणी ता.पंढरपूर येथील सभेमध्ये आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सोयीचा अर्थ काढला जात आहे व त्यांची संजय शिंदे यांना साथ असा अपप्रचार केला जात आहे असे स्पष्टीकरण आज परिचारक यांच्याकडून देण्यात आले.

परिचरक म्हणाले,लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.अशा आशयाचा संदर्भ असलेल्या भाषणाचा गैरअर्थ लावून विरोधकांकडून खोडसाळपणा ने एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे.
तरी पांडुरंग परिवारातील सर्व निष्ठावान व जिद्दी युवक कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून न घेता भूलथापांना बळी न पडता भाजप उमेदवारांचे काम करावे तसेच माझी जि भूमिका सोलापूर मध्ये आहे तीच माढा तालुक्यात आहे ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावी.
माझ्या भाषणाची धास्ती घेतलेल्या विरोधकांकडून वेगळा अर्थ लावून मतदार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडिया वरून फिरत आहे.

admin: