सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 2015 नवे बाधित; 27 जणांचा मृत्यू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 2015 नवे बाधित; 27 जणांचा मृत्यू

बरे झाले 1187
आज दि.1 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 2015 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

एकाच दिवशी 27 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज शुक्रवारी 30 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 2015 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1187 पुरुष तर 828 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1133 आहे. यामध्ये 697 पुरुष तर 436 महिलांचा समावेश होतो. आज 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 10687 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8672 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: