बार्शीच्या बिडीओ नी स्वतः सरण रचत केले कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीवर भडाग्नी देत अंत्यसंस्कार

बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः सरण रचत केले कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीवर भडाग्नी देत अंत्यसंस्कार

बार्शी ; कोरोनाच्या या महामारी मध्ये दररोज हजारो लोकांचे2बळी जात आहेत.कोरोना प्रोटोकॉल नुसार कोरोना ने मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय यंत्रणेकडून हे सोपस्कार उरकले जात आहेत. कित्येक वेळा नातेवाईक ही यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून आले आहे. आपल्याला कोरोना होईल या भीतीने अनेक अधिकारी अंग चोरून काम करीत आहेत. मात्र बार्शीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत आणि ग्रामसेवक सचिन शिंदे 0 स्वतः कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचे सरण रचत त्यांना अग्नी दिला आहे. ही घटना वैराग येथील असून शासकीय जबाबदारी बरोबर सामाजिक भान ही राखल्याचे दिसून येत आहे.

रूपा इंद्रजीत राऊत (वय-६० पिंपरी ( सा ) यांना त्यांच्या मुलाने दोन दिवसा खाली वैराग येथील संतनाथ डेडिकेटेड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.मात्र त्यांना अधिक त्रास होत असल्याने शनिवारी त्यांची प्राणज्योत मावळली.त्यानंतर वैराग ग्रामपंचायतीचे वतीने पंढरपुर रोडवरील स्मशानभूमीत सरण रचून अंत्यविधी करण्यात आला.यावेळी खुद्द गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी मयत व्यक्तीला कोवीड सेंटरमधून स्मशानभूमी पर्यंत आणून स्वतःच्या हाताने सरण रचूून भडाग्नी दिला.

गट विकास अधिकारी शेखर सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी अण्णासाहेब जगताप, स्वप्निल चौधरी, बाळासाहेब पांढरमिसे,पांडुरंग चव्हाण, प्रसाद भेंडे, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या सहकार्याने अंत्यविधी करण्यात आला.स्वतः शासकीय अधिकारी स्वतःच्या हाताने अंत्यविधी करत असल्याचे इथेच दिसून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खंबीरपणे उभी असल्याचे समोर येते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: