२ वर्षांच्या दलित मुलाने हनुमानाच्या मंदिरात प्रवेश ककेला म्हणून कुटुंबाला २५ हजाराचा दंड

( प्रतीकात्मक )

दोन वर्षांच्या दलित मुलाने हनुमानाच्या मंदिरात प्रवेश केल्याबद्दल त्या मुलाच्या कुटुंबाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरन नावाचे व्यक्ती आपल्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी गावातील हनुमान मंदिराला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या नकळत मुलाने मंदिरात प्रवेश केला होता.

 

( प्रतीकात्मक )

सदर घटना कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील मियापूर गावात ४ सप्टेंबर रोजी ही घडली आहे. जेव्हा मुलाचे वडील चंद्रशेखरन हे बाहेर पूजेमध्ये मग्न होते, तेव्हा त्यांचा २ वर्षांचा निष्पाप मुलगा नजर चुकवून मंदिराच्या आत गेला. आपल्या देशात एकीकडे जातीची बंधने तोडण्यासाठी जनजागृती केली जात असताना मंदिरात अस्पृश्यतेसारख्या जुन्या वाईट प्रथेचे पालन केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

दलित मुलाच्या मंदिरात प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त करत, देशाच्या संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरुद्ध पुजाऱ्याने त्याचे वडील चंद्रशेखरन यांना जोरदार फटकारले. धक्कादायक, म्हणजे या विषयावर ११ सप्टेंबर रोजी गावात झालेल्या बैठकीत मंदिराच्या शुद्धीकरणासाठी चंद्रशेखरन यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांनी तो भरण्यास सरळ नकार दिला. गावातील काही लोकांनी वडिलांना पाठिंबा दिला. मात्र, या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गावाच्या हद्दीतील हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

Team Global News Marathi: