1983 चा आजचाच ‘तो’ ऐतिहासिक दिवस जेव्हा भारताने ….

1983 ची परिस्थिती फार वेगळी होती. 1979च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडलेला भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असा कुणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.

यावेळी फायनलला सलग 2 वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजचे आव्हान भारतीय खेळाडूंसमोर होते. वेस्ट इंडिजच्या माऱ्यासमोर टिकून राहणे फलंदाजांना कठीण होते. अशा परिस्थितीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपचा आनंद वेगळाच होता. आज त्या घटनेला 36 वर्षे पूर्ण झाली आहेत.

वर्ल्ड कप विजयाचा प्रवास

▪ भारतीय संघाने ‘ब’ गटातून विंडीजसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता.
▪ ग्रुप स्टेजमध्ये भारताने 6 पैकी 4 सामने जिंकून गटात दुसरे स्थान पटकावले होते.
▪ उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

थरारक अंतिम सामना

▪ विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते.
▪ वेस्ट इंडिजच्या आक्रमणासमोर भारताला 54.4 षटकांत 183 धावाच करता आल्या.
▪ भारताकडून के श्रीकांतने सर्वाधिक 38 धावा केल्या होत्या.
▪ भारताच्या 183 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 52 षटकांत 140 धावांत माघारी परतला.
▪ विंडीजकडून व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी सर्वाधिक 33 धावा केल्या.
▪ या सामन्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या अमरनाथ यांना मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

भारतीय संघ असा : कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, सुनील गावस्कर, सय्यद किरमाणी, मदनलाल, संदीप पाटील, बलविंदर संधू, यशपाल शर्मा, रवि शास्त्री, क्रिष्णमचारी श्रीकांत, सुनील वाल्सन, दिलीप वेंगसरकर.

admin: