१ मे पासून मुंबईत १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण अशक्य, आयुक्त चहल यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आला होता. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरण करून घेता येणार आहे. तसेच या लसीकरणासाठी उद्यापासून अर्थात २८ एप्रिलपासून नोंदणीला सुरवात होणार आहे.

मात्र इतक्यात 18 वर्षांवरील तरुणांना कोरोना लस देता येणार नाही, अशी भूमिका मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. आयुक्त यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव तावरे यांना पत्र लिहिले असल्याचे सुद्धा समोर येत आहे, जर १ मे पासून सर्व वयोगटातील तरुणाचे लसीकरण सुरु झाले तर मोठया प्रमाणात लसीचा साठा कमी पडू शकतो तसेच लसीकरण केंद्रावर एकच गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता सुद्धा पत्रात नमूद करण्यात आलेली आहे.

मात्र आयुक्त चहल यांनी राज्य सरकरला लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. 1 मेपासून लगेच 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यास कोरोना लसींचा साठा कमी पडू शकतो. तसेच त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, असे इकबाल सिंह चहल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय देणार, हे पाहावे लागेल. तसेच राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे.

Team Global News Marathi: