15 दिवसांत हिमा दास चा गोल्डन चौकार..

ग्लोबल न्युज नेटवर्क: भारताची स्टार अ‍ॅथलॅटिक हिमा दासने  चेक रिपब्लिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत आणखी एका सुवर्णाला गवसणी घातली. २०० मीटर धावण्याच्या शर्यत २३.२५ सेकंदात पार करत तिने पंधरावड्यातील चौथे सुवर्ण कमावले आहे. १९ वर्षीय हिमाची ही कामगिरी कौतुकास पात्र आहे.  

दुसरीकडे राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनस याने ४०० मीटर शर्यतीत  सुवर्ण पदक पटकावले. त्याने ४५.४० सेकंदात शर्यत पूर्ण केली.

हिमाची पंधरावड्यातील कामगिरी सुवर्ण कामगिरी

२ जूलै पोजनान अ‍ॅथलॅटिक ग्रँड प्रिक्स स्पर्धेत हिमाने २०० मीटरची शर्यत २३.६५ सेकंदात पार करत सुवर्ण कमाई केली होती. त्यानंतर ७ जूलैला पोलंडमधील कुटनो अ‍ॅथलॅटिक स्पर्धेत २३.९७ सेकंदात तिने २०० मीटरची धाव पूर्ण केली होती. तर १३ जूलैला चेक रिपब्लिक येथील  क्लांदो मेमोरियल अ‍ॅथलॅटिकमध्ये महिला गटात तिने २०० मीटरची धाव २३.४३ सेकंदात पार करत सुवर्ण मिळवले होते.  

ग्लोबल न्युज नेटवर्क: