आता गट तट, मतभेद विसरा आणि कामाला लागा- बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या कार्यक्रमात मावळते अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थोरातांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं दिली.

कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात यांनी भाजपवर टीका करतानाच पक्षाच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्यात. आता गट तट, मतभेद विसरा आणि कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पक्षावरचं संकट मोठं आहे. काँग्रेसमध्ये अशी संकटं पचविण्याची ताकद आहे या संकटातून बाहेर पडून राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. जिथ हवे तिथ तरूण नवीन चेहरे आणि महिलांना संधी देईल जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, पक्षांतर्गत बंदीच्या कायद्याला भाजपने हरताळ फासला आहे. वंचितने मोठ्या प्रमाणावर आपलं नुकसान केलं आहे. 9 ते 10 जागांचं आपलं नुकसान केलं आहे, पुढे ही आपले नुकसान करण्याचे भाजपचा हा प्रयन्त आहे. सत्ता असता अध्यक्ष आणि सत्ता नसताना अध्यक्ष यात फरक आहे. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी मला राजीनामा द्यायला नाही सांगितलं. मी स्वतःहून जबाबदारी घेऊन राजीनामा दिला.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: