१३ महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

 

राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये १३ जून २०२२ रोजी राज्यातील १३ महापालिकांसाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे आता या महापालिकांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र यात ओबीसी आरक्षणाशिवाय ही आरक्षण सोडत होणार आहे. परंतू त्या पाठोपाठ मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीसंदर्भातील पहिली नोटीस २७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. ३१ मे रोजी अनुसूचित जाती (महिला व पुरुष), अनुसूचित जमाती (महिला व पुरुष) असा उल्लेख कारवा. ही आरक्षण सोडत १ जून रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन हरकती मागवल्या जातील. आरक्षण सोडतीवरील हरकती आणि सूचना १ ते ६ जून दरम्यान स्वीकारल्या जातील. अंतिम आरक्षण सोडत १३ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका (सिव्हील) १९७५६/२०२१ मध्ये दि. ४ मे, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्यास अनुसरुन १३ महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: