शिवसेनेचे १२ खासदार आणि २० माजी आमदार आमच्यासोबत येणार : गुलाबराव पाटलांचा दावा

शिवसेनेचे १२ खासदार आणि २० माजी आमदार आमच्यासोबत येणार : गुलाबराव पाटलांचा दावा

ग्लोबल न्यूज प्रतिनिधी | राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर शिवसेनेत अजून फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, शिंदे गटाचे खंदे शिलेदार आ. गुलाबराव पाटील यांनी नवीन गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत आतिशय आक्रमक भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आपण बंड नव्हे तर उठाव केल्याचे सांगतांनाच थेट ठाकरे पिता-पुत्रावर घणाघाती टीका केली. यानंतर ते काल सायंकाळी पाळधी येथे आले. यानंतर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक दावा केला.

आ. गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेबांसोबत ३९ आमदार आले असून नंतर संतोष बांगर देखील सहभागी झाले. यानंतर खासदारांमध्येही मोठी अस्वस्थता असून आमच्यासोबत शिवसेनेचे तब्बल १२ खासदार येणार असल्याचा दावा त्यांनी केला. यासोबत २० माजी आमदार देखील सोबत येण्यासाठी सज्ज आहेत. तर, ठाकरे यांच्याकडे असणारे काही आमदार देखील संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: