तर महाविकास आघाडी सरकार वाचले असते! काँग्रेसच्या या नेत्याचा दावा

 

मुंबई | महाराष्ट्रात आघाडीने सरकार गमावल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसनं आता उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे यांनी हुशारीनं निर्णय घेतले असते तर सरकार वाचले असते, असं मत काँग्रेसनं व्यक्त केलं आहे. एकनाथ शिंदे सरकारनं सोमवारी झालेल्या विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर राज्यात 15 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा अंत झाला आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी या वृत्तापत्राला सांगितले की, ‘एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री करावं असा सल्ला दिला होता. शिवसेनेतील बंड शांत होईल, अशी सुरूवातीला चर्चा होती. पण, त्यानंतर काही दिवसांमध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि मंत्री शिंदे कँपमध्ये दाखल झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आपण दिला होता, असे स्पष्ट केले.

‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असा प्रस्ताव मी दिला होता. तो प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांनी मान्य केला. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन, असंच ठरलं होतं. मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देवून पत्रकार परिषद झाली ती करुन मी घरी गेलो त्यावेळी नड्डा यांनी मला आधी फोन करून पक्षाचा विचार सांगितला.

Team Global News Marathi: