12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट, 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास

 

भाजपा नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर त्यांच्या कापड्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवर निशाणा साधला. भाजपाने ब्रँडसोबत राहुल गांधींचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केला आहे. टीशर्टची किंमत ४१,२५७ रूपये असल्याचा आरोप भाजपाने केला असून यावर टीकास्त्र सोडत ‘भारत देखो’ असं म्हटलं आहे. यानंतर आता काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर बोचरी टीका केली आहे. “12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास!” असं म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास! साहेब, तुम्हाला पाहिजे तेवढा गोंधळ करा, मुद्दा तुमच्या आणि आमच्या कपड्यांचा नाही. तो 140 कोटी लोकांच्या ‘रोटी, कपडा आणि मकान’चा आहे. आम्ही त्या मार्गावर अडून राहू” असं कन्हैया कुमार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही..! ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपला धडकी भरली आहे असं म्हणत बोचरी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “भाजपाचे भय संपत नाही…! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपाला धडकी भरली आहे राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही…. आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे 10 लाख रुपयांचा सुट परिधान करतात” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: