ठाणे : सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये वृद्धांसह तरूणांचाही समावेश आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रोज रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, यातही एक सकारात्मक वृत्त समोर येत आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर १०२ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे.
सुशीला फाटक असं या आजींचं नाव आहे. कोरोनाला घाबरु नका, कोरोनाशी दोन हात करा. तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल, असा मोलाचा सल्लाही या आजींनी दिला कोरोनाशी लढत असलेल्या रुग्णांना दिला आहे. आजींना डिस्चार्ज देताना हॉस्पिटलमधील नर्स, डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी केक कापून आजींचे अभिनंदन केले होते. तसेच आनंदाने त्यांना घरी पाठवले.
समोर आलेल्या महिनीनुसार सुशीला पाठक या मुंबईतील अंधेरी येथे राहतात. ७ एप्रिलला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, बेडच्या कमतरतेमुळे त्यांना ठाण्यातील होरायझन प्राईम या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन आठवडे फाटक यांच्यावर उपचार सुरू होते. १०२ वर्ष वय असेलेल्या आजींचे नेमके पुढे काय होणार असा प्रश्न तय्नाच्या नातेवाईकांना पडला होता. पण आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपर्डेकर आणि डॉक्टर अभिजीत बोपर्डेकर यांनी आजींची इच्छाशक्ती पाहिली आणि आजी कोरोनावर सहज मात करतील हे दोघांच्या लक्षात आल. त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या आजीवर उपचार करण्याची पूर्ण मुभा दिली. १५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या आजींनी कोरोनावर मात केली.