10 जून पासून मुंबईत राईडरसह पाठीमागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती

 

मुंबई | मुंबईच्या रस्त्यावर बाईक स्वार यांच्याकरिता अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बाईकवर प्रवास करणाऱ्या रायडरसह मागे बसणाऱ्याला व्यक्तीला देखील हेल्मेट घालने सक्तीची असणार आहे . मुंबई वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आलेले नवीन परिपत्रकाची अंमलबजावणी 10 जून पासून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिलेले आहे. तसेच हेल्मेटसक्तीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी मुंबईकरांना केले.

मुंबई वाहतूक पोलिसांकडून 25 मे रोजी परिपत्रक काढण्यात आले होते, त्याची अंमलबजावणी 10 जून पासून सुरू होणार आहे. या परिपत्रक म्हटले आहे की, विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यास वाहन कायद्यानुसार 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी चालक परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल मुंबईचे पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुचाकीस्वारांना आणि सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती करण्याचे पत्रक वाहतूक पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी 25 मे रोजी काढले होते. 15 दिवसांनंतर अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवासी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आणि 3 महिन्यांसाठी चालक परवाना निलंबित करण्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

 

Team Global News Marathi: