10 टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचा बार्शी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

10 टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचा बार्शी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

बार्शी: वंजारी समाजाला सध्या असलेले 2 टक्के आरक्षण तोकडे असून समाजाला न्याय मिळण्यासाठी हे आरक्षण वाढवून 10 टक्के करावे या मागणीसाठी वंजारी समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, गोपीनाथ मुंडे व भगवान बाबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी अनुष्का कुटे, वैष्णवी कुटे,अविद्य घुले,पूजा लहाने,सोनाली वणवे यांनी वंजारी समाजातील शाळकरी मुलींनी आक्रमक भाषण करून आरक्षण देण्याची प्रभावी मागणी केली.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
वंजारी समाज्यास राज्यात NT-D प्रवर्गात केवळ 29 आरक्षण असून ते अतिशय तोकडे आहे.
वेळोवेळीच्या शासकीय आदेशाने, परिपत्रकाने व न्यायालयीन निवाडयाने हे 2 % आरक्षण देखील
अतिशय संकुचित करून ठेवले आहे. त्यामुळे १०% वाढीव आरक्षण देण्यात यावे.

वर्तमान वंजारी समाज्याच्या लोकसंखेच्या प्रमाणात हे 2% आरक्षण नगण्य आहे.खुल्या प्रवर्गात
प्रविष्ट होता येत नाही, हे वेगळच आरिष्ट. उच्च शिक्षणासाठीच्या संधी नसल्यागत झाल्या आहेत. वंजारी समाज प्रामुख्याने दन्या खोऱ्यातील दुष्काळग्रस्त कोरडवाहू जमीन कसणारा शेतकरी,
ऊसतोड कामगार, शेतमजूर, हमाली करणारा आहे.
सुशिक्षीत बेकारांना उद्योग, व्यवसायासाठी आर्थिक निधी उपलब्ध नाही. जातनिहाय जनगणना करण्यात यावी. लोकसंखेच्या प्रमाणात वंजारी समाजाला १०% आरक्षण द्यावे. उद्योग, व्यवसायसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे.

जिल्हा निहाय वस्तीग्रह व्हावेत.


समाजासाठी क.गोपीनाथराव मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करावे.मागासवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ता धारक स्पर्धकांना खुल्या प्रवर्गामध्ये सर्व स्तरातील शिक्षणाची व नोकरीची संधी पूर्ववत मिळावी. आदी मागण्यासाठी तहसील कार्यालयावर हा सामाजिक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: