भीमेला पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, जलसंपदा विभागाचा इशारा

पंढरपूर –  पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर अतिवृष्टी होत आहे तसेच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात ही पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणारी आवक वाढत चालल्याने प्रकल्पातून भीमा नदीत सायंकाळपासून 70 हजार क्युसेकने पाणी सोडले जात असले तरी यात वाढ होवून हा विसर्ग 80 हजार व यापेक्षा ही जास्त होवू शकतो तर दुसरीकडे नीरा साखळी धरणातील वीरमधून 23 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.

 यामुळे उजनी व वीरचा विसर्ग मिळून भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 25 हजार क्युसेकने वाहू शकते. यासाठी भीमाकाठी पूरसदृष्य स्थिती निर्माण  होवू शकते असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 पंढरपूरजवळ पुराची इशारा पातळी ही 1 लाख 16 हजार क्युसेक इतकी आहे तर धोकापातळी 1 लाख 87 हजार क्युसेक इतकी आहे.  वीर व उजनीचे पाणी पाहता पुराची इशारा पातळी भीमा ओलांडण्याची दाट शक्यता असल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरण ,पंढरपूर शहर ते  अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी पयर्ंंत नदीच्या दोन्ही तिरांवर खबरदारी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.उजनी धरणात सध्या 111 टक्के पाणी साठा आहे.  एकूण पाणी 123 टीएमसी इतके असून यात उपयुक्त साठा हा 59.62 टीएमसीचा आहे. येथे पाणी साठविण्याची क्षमता आता संपली आहे.

धरणातून वीज निर्मितीसाठी 1600, कॅनॉल 3150, सीना माढा- 320, दहिगाव 120 व बोगद्यात 1200 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.  भीमा खोर्‍यातील अनेक प्रकल्पांवर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने तेथून पाणी सोडल्या जाणार्‍या पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. 

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: