पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ४२ टक्के मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल |

 

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून अनेकांना डच्चू सुद्धा देण्यात आला होता. मात्र आता माहितीच्या अधिकाराखली एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीद्वारे अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या केंद्रीय मंत्रिमंडळातील तब्बल ४२ टक्के म्हणजे ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे खटले सुरू आहेत. तर २४ मंत्र्यांवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या गंभीर गुह्यांची नोंद आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि एडीआरच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे मंत्र्यांवरील गुन्हे, संपत्ती, शिक्षण यासंदर्भातील अहवाल तयार केला आहे. विस्तारानंतर मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ७८ वर पोहचली आहे. यातील बहुतांश मंत्र्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल असून काही जणांच्या विरोधात तर खटले सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न, दरोडा, महिला अत्याचार, भ्रष्टाचार तसेच पाच वर्षांहून अधिक शिक्षा होणाऱया गंभीर गुह्यांचा समावेश आहे.

 

Team Global News Marathi: