स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणारे पवार काँग्रेस सोबत कसे-उद्धव ठाकरेंचा सवाल

टीम ग्लोबल न्यूज:
उस्मानाबाद |  शरद पवार हे स्वतःला राष्ट्रवादी म्हणवता मग देशद्रोही कलम काढून म्हणणाऱ्या काँग्रेससोबत का आघाडी केली असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांना विचारला आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ ऊस येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले,अयोध्येत राम मंदिर उभारणे, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा असणाऱ्या 370 कलम रद्द करणे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला व एनडीएमध्ये सामील झालो. शरद पवार तुम्ही स्वतःला राष्ट्रवादी म्हणवता मग देशद्रोही कलम काढू म्हणणारा जाहीरनामा आणि जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा चालू ठेवू म्हणणाऱ्या काँग्रेससोबत तुम्ही का आघाडी केली असा सवाल त्यांनी शरद पवारांना विचारला. तसेच शिवसेना भाजपची युती हिंदुत्वासाठी आणि देश आणि धर्मासाठी, देशद्रोह्यांना फासावर लटकवणार सरकार आणण्यासाठी आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.यावेळी त्यांनी ओमराजेंना विजयी करण्याचे आवाहन केले.

admin: