मी काय म्हातारा झालोय का? शरद पवारांची मिश्किल टिपण्णी

गेवराई: तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात या वयातही शरद पवार इतकं फिरतात. मी काय म्हातारा झालोय का?, यापुढे असं बोलायचं नाही अशी सर्वांसमक्ष वॉर्निंग शरद पवार यांनी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांना दिल्याने सभेत एकच हशा पिकला.

बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-काँग्रेस महा आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचारार्थ बीड जिल्ह्यातील आष्टी, गेवराई याठिकाणी सभा घेतल्या. गेवराई येथील सभेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या भाषणात शरद पवार या वयातही इतकं फिरत आहेत असे म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी ही आक्रमक भाषण केले. व शेवटी अमरसिंह पंडित याना बोलावून घेतले. आणि मी तुम्हाला वॉर्निंग देतो की यापुढे अस बोलायचं नाही. अशी मिश्किल टिप्पणी केली.

admin: