सोलापूर: सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या ही रोज वाढतच असून ती आता 124 झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठकीत दिली आहे.सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्यांनी सांगितले.
याआधी पालकमंत्री यांनीसुद्धा अशाप्रकारे माहिती दिली होती . जिल्हाधिकारी यांच्याकडून ही माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येत असते.आजच्या आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सह सर्व अधिकारी उपस्थित होते.
रविवारी चार वाजता आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते नेमके कोणत्या भागातील रुग्ण वाढले याविषयीची माहिती संध्याकाळी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून मिळेल.