मुंबई | मुंबईच्या जे जे मार्ग पोलीस स्टेशनच्या 12 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 12 जणांमध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदरील पोलिसांच्या संपर्कात आलेल्या 44 इतर पोलिसांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी माहिती दिली आहे.
राज्यभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरची लागण पोलिसांना सुद्धा होऊ लागल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत राज्यभरात 385 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 3 पोलिसांचा मृत्यू झालाय.