सोलापुरात सुशीलकुमार शिंदे व प्रकाश आंबेडकर यांची भेट

सोलापूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले प्रतिस्पर्धी वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी असताना झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात उलट सुलट  चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, ही भेट अचानक झाली असे सांगण्यात आले आहे.,

शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांना भेटले, असं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या या भेटीने शहरात राजकीय चर्चा रंगत आहेत.

बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.  सोलापूर येथून सुशीलकुमार शिंदे,प्रकाश आंबेडकर व जयसिद्धेश्वर महाराज अशी तिरंगी लढत होत आहे.

admin: