राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चाचे करायचे काय निवडणूक आयोगाला पडला प्रश्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात होत असलेल्या जाहीर सभांचा खर्च कोणत्या राजकीय पक्षाच्या निवडणूक हिशोबात धरायचा असा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे.

नांदेडच्या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात केलेल्या भाषणांच्या क्लिपचा आधार घेत, मोदींनी दिलेली आश्वासनं किती पोकळ होती, हे आपल्या भाषणातून सांगितलं. गेली साडेचार वर्ष मोदींनी जनतेंची फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यावेळी आपण भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार राज ठाकरेंनी यांच्या विविध सभा राज्यभरात होणार आहे.

परंतु यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. तसेच प्रचार सभांमध्ये ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ला ही मत द्या किंवा अमुक उमेदवाराला विजयी करा असे ही आवाहन कारत नाहीत.त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.भाजपने आयोगाला पत्र लिहून हा खर्च संबधीत पक्षाच्या नावावर टाकावा असे पत्र दिले आहे.आता आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

admin: