सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा, पवार परिवारातील महिलांनी केले औक्षण

मुंबई:आज सुप्रिया ताईंच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी वडील शरद पवार व आई प्रतिभा पवार व पती सदानंद सुळे यांच्या उपस्थितीत बंधू अजितदादा पवार, भावजय सुनेत्रा पवार व पवार परिवारातील महिलांनी सुप्रिया ताई यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षातील अनेक नेते व कार्यकत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अभ्यासु खासदार म्हणून राज्यात ओळख आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या अशी त्यांची राज्यात ओळख असली तरी त्यांनी आपल्या कारकिर्दीतून स्वतःचा राजकीय प्रभाव तयार केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 या तीन निवडणुकांतून त्या विजयी झाल्या. या आधी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या.

महिला, अपंगांसाठीचे धोरण, भटक्या विमुक्यांचे प्रश्न यात त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातले. राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या संघटना वाढविण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. लोकसभेत विविध विषयांवरील भाषणे वाखाणली गेली. आपल्या मतदारसंघातील 25 हजारांहून अधिक विद्यार्थिनींना सायकल वाटण्याच्या त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले.  

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: