सुजय विखे पाटील म्हणजे स्वतः चे मत नसलेली व्यक्ती, 70 वर्षात काय झालं या प्रश्नावर बालिश सारख्या टाळ्या वाजवता: रोहित पवारांची टीका

टीम ग्लोबल न्युज :
पक्ष वेगळे असतात, विचार वेगळे असतात मात्र समोरच्या पक्षामध्ये जे निस्वार्थी भावनेतून आयुष्यभर एकनिष्ठ रहात काम करत असतात त्यांच्याबद्दल एक व्यक्ती म्हणून नेहमीच आदर असतो. आज दिलीप गांधी यांच्यासोबत जी घटना घडली त्याबाबत एक व्यक्ती म्हणून वाईटच वाटतं अशी प्रतिक्रिया शरद पवारांचे नातू रोहित पवार व्यक्त केली.
अहमदनगर च्या सभेतील खासदार दिलीप गांधी यांच्या भाषण करू न देण्याचा प्रकाराबद्दल त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी म्हटलंय की
दिलीप गांधी यांनी केलेल्या विकासकामांबद्दल प्रश्नचिन्हच आहेत पण ते भारतीय जनता पक्षासोबत अगदी युवामोर्चापासून संबधित आहेत. भाजपचे एकनिष्ठ म्हणून ते ओळखले जातात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष पोहचवण्यासाठी दिलीप गांधी यांनी सहकार्य केलं हे कोणिही नाकारू शकणार नाही.

आमचे उमेदवार संग्राम जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच आहेत पण त्याचवेळी समोरच्या पक्षातील एकनिष्ठ लोकांना डावलेले जात असेल तर एक व्यक्ती म्हणून बोलायलाच हवं. घडलेली घटना फक्त एक उदाहरण आहे. निवडणुक जिंकण हे एकमेव धोरण आखून एकनिष्ठ लोकांचा बळी देण्याच काम फक्त वैचारिक मुल्य हरवून बसलेल्या पक्षाकडूनच होवू शकतं. जिंकण्याच्या नादात आयुष्यभर आपल्यासाठी झटणाऱ्या माणसांना आपण दूर सारत असाल तर जनतेबद्दल, सर्वसामान्य लोकांबद्दल तुमच्या मनात कोणत्या भावना असतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मोदी-शहा यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीच या पक्षात काहीही चालत नाही हे उघड सत्य आहे.

शेवटी एक गोष्ट भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांना देखील सांगू वाटते, ७० वर्षात काय झालं हा प्रश्न मोदींनी विचारला तेव्हा आपण टाळ्या वाजवत होता. स्वार्थापोटी आपण कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केलेली कामे विसरला असाल. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील इतर नेते व आपले पणजोबा, आजोबा, वडिल देखील कॉंग्रेसच्या या विकासकामांचे साक्षीदार आणि सहकारी राहिले आहेत. अशा वेळी आपण झालेल्या कामांचा दाखला न देता त्यांच्या हो मध्ये हो मिसळून टाळ्या पिटता याहून अधिक दुर्देव नसेल. स्वत:चे मत नसलेल्या व्यक्तीकडूनच असे (बालिश) प्रकार घडू शकतात.

admin: