नरेंद मोदींच्या भाषणातून विकासाचे मुद्दे गायब-राज ठाकरे,नांदेडच्या सभेत मोदी- शहांवर पुन्हा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही देशाची गळचेपी करत आहेत असा आरोप करत काश्मीर मध्ये आरडीएक्स कोठून आले असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नांदेड येथील सभेत केला.
गुजरातचे खोटं चित्र उभा करून देशाला गंडवल असल्याचा घणाघात त्यांनी केला. ते म्हणाले, पीएम मोदी सदासर्वदा इलेक्शन मोडमध्ये  असतात, त्यांच्या भाषणातून  विकासाचे मुद्दे गायब झाले आहेत, योजनांवर बोलत नाहीत. मराठवाड्यातील  भीषण परिस्थिती अशीच राहिल्यास ५० ते ६० मराठवाड्याचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती परिस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी अडीचशे ते तीनशे वर्ष लागतील. 

जनतेने मोठ्या अपेक्षेने देश यांच्या हातात दिला मात्र नरेंद्र मोदी फक्त थापा मारत राहिले. प्रचार करताना भाषणात बोलण्यासाठी मोदींकडे मुद्देही राहिलेले नाहीत त्यामुळे ते नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या गोष्टी सांगत आहेत. त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? प्रधानसेवक हूँ हे वाक्यही पंडित नेहरू यांचेच आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. तसेच मोदी शाह यांच्या जोडगोळीला सत्तेवरून हाकला असेही आवाहन राज ठाकरेंनी केले. निवडणुकांच्या वेळी हे प्रश्न विचारतात की भगतसिंग जेव्हा तुरुंगात होते तेव्हा काँग्रेसचे कोणी नेते त्यांना भेटायला गेले होते का? असा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारला होता. त्याचे उत्तरही राज ठाकरेंनी दिले, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दोनवेळा भगतसिंग यांची भेट घेतली होती. मात्र हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही कारण त्यांचा इतिहास कच्चा आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

admin: