सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुनः वाढ

शिराळा तालुक्यातील 5 पूल पाण्याखाली
सांगली । कृष्णा नदीपात्रातील पाण्यामध्ये मध्ये वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 28.6 वर गेली आहे. त्यामुळे नदी काठच्या भागांना सतर्क राहण्याचे आदेश महापालिका देत आहे. तसेच शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परीसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या सांडव्यातुन विसर्ग वाढवला आहे. तर पुन्हा पुरस्थीती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फुटावर पोहचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी आदी भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजूनही पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने शासकीय यंत्रणेकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: