समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहणार — राजेंद्र राऊत

समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहणार — राजेंद्र राऊत

  बार्शी: मी सुद्धा कष्टकरी शेतकरी कुटुंबातील असून, कष्टकरी जनतेचे सर्व समस्या, अडचणी मला ज्ञात आहेत. समाजामध्ये वावरत असताना तळागाळातील समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहणार असे अभिवचन अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दिले.

बार्शी शहरातील महेदिनगर येथील महिला विडी कामगार माता भगिनींच्या संवाद दौ-याप्रसंगी राजेंद्र राऊत बोलत होते.

यावेळी नगरसेविका योजनाताई पवार, नागजी दुधाळ, भारत पवार सर,दिपक राऊत,नाना गाढवे,रमजान महदवी,आरिफ महदवी,इमाम लांडगे व या भागातील माता भगिनींनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले,जेणेकरून समाजातील प्रत्येक कष्टकरी कुटुंबाचे अर्थकरण वाढून ते कुटुंब सुख समाधानी व आनंदी राहील याची मी काळजी घेणार आहे. कष्टकरी समाज हा प्रामाणिक व कष्टाळू असून त्यांच्या कष्टाची किंमत ही न मोजता येणारी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या समोर असलेल्या अनेक समस्यांना ते तोंड देताना, त्यांच्यासोबत माझा हातभार नक्कीच लागेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

  विडी कामगार महिलांसमोरील असलेली आव्हाने त्यांच्या समस्या सोडविण्याचा मी नक्कीच शर्थीने प्रयत्न करणार असल्याचे वचन यावेळी त्यांनी दिली.

विडी कामगारांना हक्काचे घरकुल देण्याचे व शासनाच्या इतर योजना जास्तीत जास्त प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ त्या कुटुंबांना कशाप्रकारे होईल याचाही उलगडा त्यांनी यावेळी कामगार माता-भगिंनी समोर व्यक्त केला.

  या कष्टकरी महिला माता भगिनी, त्या कुटुंबाचा  कणा असून, ते कुटुंबाचे काळजी घेऊन आपल्या कुटुंबाचा चरितार्थ अतिशय योग्य पद्धतीने चालवत असून त्यांचे कष्ट हे माझ्यासाठी आदर्श व प्रेरणादायी आहे, असेही राजाभाऊ म्हणाले.

या विधानसभा निवडणुकीत तुम्हां माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे असावा. हा मतदानरूपी आशीर्वाद घेण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे, निश्चितच आपण ते आशीर्वाद देताल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  नगराध्यक्ष अॅड. आसिफभाई तांबोळी म्हणाले की, राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखालील काम करताना समाजातील कोणताही कष्टकरी घटक विकासापासून व प्रगती पासून वंचित राहणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली.या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून राजाभाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनायांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

  माजी नगराध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की, राजाभाऊ च्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्ही नगरपरिषदेमार्फत सात हजार नवीन घरकुले बांधली असून भविष्यात ही अजूनही नवीन घरकुले देणार आहेत. त्याचा लाभ नक्कीच आपणाला होईल असेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: