संघटन,आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्रात वेगळा ठसा निर्माण करेल-मेहबूब शेख, जिल्हा प्रभाऱ्यांच्या केल्या नियुक्त्या

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिलेला दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून युवक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

विविध जिल्ह्यांच्या जिल्हा प्रभारीपदी राष्ट्रवादीने तरूण कार्यकर्त्यांचा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार केलेला दिसून येत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त जिल्हा प्रभाऱ्यांचे अभिनंदन करून आपण सर्व मिळून राज्यातील युवकांचे प्रश्न रस्त्यावर येऊन आक्रमक पध्दतीने सोडवू .येणाऱ्या काळात संघटन,आंदोलन या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्रात वेगळा ठसा निर्माण करेल असा विश्वास युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट साठी ग्लोबल न्यूज मराठी हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा…

धिरज करळे: