प्रा.विशाल गरड लिखित ‘मुलुखगिरी’ चे प्रकाशन

बार्शी :   पांगरी ता.बार्शी येथील वक्ते तथा लेखक प्रा.विशाल गरड यांच्या बहुचर्चीत मुलुखगिरी या पुस्तकाचे प्रकाशन राकेश मंडलिक यांच्या हस्ते पांगरी येथे संपन्न झाले.

अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तात्या बोधे होते .त प्रमुख पाहुणे म्हणून स.पो.नि सचिन हुंदळेकर, सरपंच इन्नूस बागवान, अॅड.अनिल पाटील, नवनाथ कसपटे, प्रा.विलास जगदाळे, मोहन घावटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलुखगिरी हे पुस्तक प्रा.गरड यांनी आजवर दिलेल्या व्याख्यानांच्या अनुभवांच्या रोजनिशीचा संग्रह आहे. नवोदित युवकांना प्रबोधन क्षेत्रात येण्यास प्रवृत्त करणारे हे पुस्तक असुन साहित्य क्षेत्रात हे पुस्तक एक वेगळा ठसा उमटवेल असे प्रतिपादन लेखक विशाल गरड यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गृहिणी असुन तिनशे पुस्तके वाचलेल्या भाग्यश्री शिंदे यांचा आणि सिनेमॅटोग्राफर अमोल लोहार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी खंडू डोईफोडे, प्रमोद भोंग, विश्व लिमये, ऋषिकेश जाधव, शुभम मिसाळ, ऋषिकेश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून प्रा.गरड यांना शुभेच्छा दिल्या.

  प्रास्ताविक गणेश गोडसे यांनी केले तर सुत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम तरूण मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.

धिरज करळे: