शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवावी-राजेंद्र चौधरी


बार्शी : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी केले. उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान अंतर्गत कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार पंधरवडा कार्यक्रम तालुक्यातील भाईंजे येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

कृषी विभागामार्फत रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत दि.२५ मे ते ८ जून अंतर्गत कृषी विदयापीठात विकसीत झालेले तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना ऊसावरील हुमणी अळी व मका पिकावरील लष्करी अळी आदीबाबत शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याचे काम पार पडले . त्याचाच भाग म्हणून भोईंजे येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी सुधीर निकम होते. 

यावेळी कृषी सहायक सयाजी गायकवाड यांनी खरीप पीक लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी तर कृषि पर्यवेक्षक बी.के.पाटील यांनी बीजप्रक्रिया ऊसावरील हुमणी अळीच्या व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी दिलीप राऊत यांनी कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. कुर्डूवाडीचे तंत्र अधिकारी एस.बी.शिंदे यांनी पाणी व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी भोईंजे गावातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल गायकवाड, कृषी सहायक यांनी परिश्रम घेतले.

धिरज करळे: