शरद पवार बारामतीत आले आणि पुरग्रस्तांसाठी तासाभरात जमा झाली कोटींची मदत

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीत आले असता केवळ अर्धा तासात सांगली आणि कोल्हापूर च्या पूरग्रस्तांसाठी पवार यांनी विविध संस्था आणि शहरातील दानशुरांच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी 5 लाख रुपये रोख रक्कम , तांदूळ गहु ज्वारी साखरेची शेकडो पोती, नवीन कपडे, हवाबंद पाकीटातील खाद्यपदार्थ, भांडी, पाण्याच्या बाटल्या, ब्लँकेट, शैक्षणिक वस्तू, औषधे, वैद्यकीय सेवा व बचावकार्यात मदत करण्यासाठीचे मनुष्यबळ देण्याचा निर्णय झाला. व लगेच मदत ही पाठवण्यास सुरुवात केली.

थोड्या वेळापुर्वी बारामती बाजार समितीच्या रयत भवन येथे पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला सर्वसामान्य बारामतीकर, शेतकरी, व्यापारी, सर्व जाती धर्माच्या संघटना, बांधकाम व्यावसायिक संघटना, साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, माजी सैनिक संघटना, हमाल संघटना, तरुण मंडळे, मेडीकल व डॉक्टर असोसिएशन, सराफ संघटना, पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यक्ती अशा सर्वांनी उस्फूर्त प्रतिसाद देत वरील मदत जमा केली.

अनेक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी आपला एका दिवसाचा पगारही देऊ केला. यात पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून पवारसाहेब अध्यक्ष असणाऱ्या विद्या प्रतिष्ठान संस्थेकडून सदरच्या बैठकीत 50 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. उद्या पवारसाहेबांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर प्राधान्यक्रम ठरवून सदरची मदत वितरीत केली जाईल. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून पूरग्रस्त निधीसाठी बँक खाते उघडण्याचेही यावेळी नियोजन करण्यात आले.

साभार: सचिन पाटील

ग्लोबल न्युज नेटवर्क: