शरद पवारांनी फोन केला अन विषयच संपला.!

उस्मानाबाद: जालना येथील महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनाकाळे झेंडे दाखविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांचा प्रशासनाने धसका घेतल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. औरंगाबादेत शनिवारी होणाऱ्या पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पूजा मोरे यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिसांनी नजरकैदेत ठेवले.

मात्र, पोलिसांच्या एकूणच वर्तनावरून संताप व्यक्त
करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा
सक्षणा सलगर यांनी ठाण्यात धाव घेतली. त्यांनी
फेसबुक लाइक केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष
शरद पवार ,खासदार सुप्रिया सुळे,माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यानंतर मोरे यांची रात्री १० वाजता सुटका करण्यात आली.

मराठवाड्यात पावसाअभावी शेतकरी हवालदील
असून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत
असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश
यात्रेद्वारे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत
असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी
संघटनेने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा
मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा
२५ ऑगस्ट रोजी दिला होता.

या इशाऱ्यानंतर आठवडाभरातच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जालना येथे आली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले होते.

त्यानंतर जामिनावर सुटलेल्या पूजा मोरे १६
सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी
औरंगाबाद येथे काढण्यात येणाऱ्या आक्रोश
मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी
उस्मानाबादेत आल्या होत्या.

यावेळी त्यांनी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात माहिती
देऊन माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी
मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही
केले. पत्रकार परिषद संपवून त्या खाली येताच
स्थानिक गुन्हे शाखा व आनंदनगर पोलिसांनी
त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस
कॅनमध्ये घालत आनंदनगर पोलिस ठाण्यात
नेले. पोलिसांना कोणत्या कारणासाठी ताब्यात
घेत आहेत अशी विचारणा करणाऱ्या स्वाभीमानी
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे
यांच्यासह कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात
घेतले. दरम्यान, राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या
प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी हा प्रकार
समजताच आनंद नगर पोलिस ठाण्यात धाव
घेतली. त्यांनी पोलिसांना जाब विचारला तसेच
संताप व्यक्त हा प्रकार चव्हाट्यावर आणला. सलगर यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून माहिती दिली दिली त्यांनी ही तात्काळ पोलीस स्टेशन ला फोन केला. तसेच फेसबुक लाईव्ह पाहून खासदार सुप्रिया सुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी फोन करून याप्रसंगी मदत केल्याचे पूजा मोरे व सक्षणा सलगर यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे ही माहिती दिली व या सर्वांचे आभार मानले.

असा घडला घटनाक्रम

स्वाभिमानी शेतकरी संघटना युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे या शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थित होत्या. त्यांच्या पाठोपाठ जवळपास ५० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा विश्रामगृहात आला. प्रेस झाल्यानंतर आपल्याला
अटक होणार, याची मोरे यांना जाणीव झाल्याने त्या बराच वेळ वरच्या मजल्यावरच कार्यकत्यांसह बसून होत्या. अखेर अर्धा तासांनी त्या खाली येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस वाहनात बसविले. विरोध करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अन पवार यांच्या फोन नंतर सोडून दिले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: