मुंबई | शिखर बँक प्रकरणी ईडी ने गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं. शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी रिट्वीट करत या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कोणावर सूडबुद्धीने कारवाई होणार नाही असे वक्तव्य केले होते त्यात आता संजय राऊत यांची भर पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मी महात्मा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानाबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी तपासाला सहकार्य करणार. पण एक सांगतो, हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे, असं पवारांनी ट्वीट करून म्हटलं होतं.
नवी मुंबईच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील कुणावर सूडबुद्धीने कारवाई होणार नाही. सूडबुद्धीचा महाराष्ट्राचा संस्कार नाही, असं म्हटलं होतं.
दरम्यान, पवारांचा महाराष्ट्र बाणा संजय राऊतांना चांगलाच भावलेला दिसून आला. त्याचमुळे त्यांनी पवांरांचं ट्वीट रिट्वीट केल्याची चर्चा आहे.तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून शिवसेना नेहमीच मराठी माणूस व मराठी अस्मितेच्या विषयावर ठाम पणे मराठी माणसांच्या पाठीमागे उभा राहत असल्याचे महाराष्ट्र व देशाने अनेकवे8पाहिले आहे. त्यावेळी पक्षाने राजकीय फायद्या तोट्याचा ही कधी विचार केला नाही.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.