विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील यांची निवड

मुंबई | राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रिपदाचा पदभार शुक्रवारी स्वीकारला. शनिवारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी फेरबदल करण्यात आले आहे. दिलीप वळसे-पाटलांची आता विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

खरंतर दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांना नियुक्त केले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या. आता राज्यपालांनी दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे. आता शनिवारी महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणीही येईल. यामुळे या नव्या सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा आहे. उद्या उद्धव ठाकरेंच्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: