मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ओवेसींचे टीकास्त्र, दिला असा सल्ला

नवी दिल्ली | उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. गुरुवारी सायंकाळी थाटामाटात त्यांचा शुपथविधी सोहळा पार पडला. यानंतर आता त्यांना टीकेचाही सामना करावा लागत आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे उद्धव यांना माहित आहे का? असा सवाल त्यांनी ठाकरेंना केला आहे.

गुरुवारी कॅबिनेटची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना धर्मनिरेपक्षतेविषयी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी उत्तर देताना पत्रकारांनाच प्रश्न विचारला. त्यावरून ओवेसी यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ओवेसी म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंना उत्तर देता आलेलं नाही. हा प्रश्न काही फार विचार करून उत्तर देण्याचा नाही.

उद्धव यांनी काही ज्ञान घ्यायला हवं. धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू राष्ट्र नाही हे समजून घ्या आणि श्रद्धेच्या नावावर तुम्हाला भेदभाव करता येणार नाही हेही लक्षात घ्या असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: