विखे पाटलांनी घेतले साईदर्शन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षाना अशा दिल्या शुभेच्छा…

शिर्डी | राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई दरबारी हजेरी लावत, साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील दुष्काळ हटून राज्यातील धरणे भरू दे, असं साकडं त्यांनी साईबाबांना घातलय. साई दर्शनानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा दिल्या. तर विधानसभेत 230 जागांवर युतीचा विजय होईल अशी परिस्थिती असल्याचे सांगत, नवीन अध्यक्षांनी पक्षातील लोक कसे टिकून राहातील याची खबरदारी घ्यावी. असा सल्लाही विखेंनी थोरातांना दिला आहे.

मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना विखे म्हणाले की, मुख्यमंत्री चांगले काम करत असून, जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा ठाम विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला. मात्र युतीत बेबनाव वाढू नये म्हणून अन्य मंडळींनी यावर भाष्य करण्याचे टाळावे. अशी प्रतिक्रिया विखे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत दिली.

तर काँग्रेसबद्दल विचारले असता विखे म्हणाले की, मी आता नवीन भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेसची अधोगती होणार की प्रगती याचा विचार त्यांनीच करावा. मात्र जुनेच चेहरे नवीन मेकअप करून समोर आणले जात आहेत. लोकांच्या मनात भाजप सरकार विषयी विश्वासहर्ता असून, मी अनेक वेळा सरकार विरोधात बोललो, मात्र सरकारने भूमिका घेत कामं केल्याचे विखे यावेळी म्हणाले.

सुजय थोरात  विमान प्रवासाविषयी काय बोलले?

सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा एकत्र एकाच विमानाने प्रवास हा योगायोग असून, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमची भूमिका ठरलेली आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा जशा आम्ही जिंकल्या, त्याच पध्दतीने नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकू. असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केलाय.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: