वंचित बहुजन आघाडी , आमदार बच्चू कडू यांची आहे ही इच्छा ,वाचा सविस्तर-

मुंबई | तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुक होणार असुन त्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरण करून काँग्रेस राष्ट्रवादीला नाकात नऊ आनणारी वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत महत्वाचा रोल ठरणार असल्याने यात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे वंचित सोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

दलित मुस्लिम समाजाला एकत्र करत बहुजन वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. लोकसभा निवडणूक स्वबळावर वंचित लढली यात औरंगाबादचे इम्तियाज जलील एकमेव खासदार झाले. तर राज्यात अनेक जागेवर वंचितचे उमेदवार प्रभावशाली ठरले.

वंचितने काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक खासदार पाडले त्यामुळे विधानसभा निवडणूकीत मोठं फॅक्टर वंचित ठरणार असल्याने राज्यात लक्षवेधी व अफलातून आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची ताकत महाराष्ट्र भर आहे. त्यामुळे प्रहार संघटना वंचित आघाडी सोबत युती करण्याच्या तयारीत आहे.

बच्चू कडू हे लवकरच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असून राज्यभर वंचित सोबत युती करून बच्चू कडू प्रचार करणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत बच्चू कडू यांची चर्चा झाली नसून आघाडीची चर्चा रंगली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: