शरद पवारांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात तो विमानतळावर सामान विसरला आणि ……

मुंबई: परेश राजीव मार्कडेय या लातुरच्या तरुणाने काल फेसबुक पोस्टद्वारे स्वतःच्या शब्दात सांगितलेला पुणे विमानतळावरचा प्रसंग. (अनुवादित)

विमानातून उतरल्यापासून एअरपोर्टच्या बाहेर पडेपर्यंत शरद पवारांसारख्या मोठ्या माणसासोबत चालण्याचा अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखा आहे. मी उत्साहाच्या भरात त्यांच्यासोबत चालत राहिलो आणि हा सेल्फी घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी माझे सामान आतमध्येच विसरलो आहे. मी सामान घेण्यासाठी पुन्हा माघारी वळलो पण सुरक्षारक्षकांनी आत जाण्यास मला मनाई केली.

एवढ्यात शरद पवारांनी हात उंचावला आणि तो जे काही आतमध्ये विसरला आहे ते त्याला द्या असे त्यांनी सांगितले. तो माझ्यासोबत इथपर्यंत बोलत आला आणि त्यामुळे त्याचे सामान आतमध्येच विसरुन राहिल्याचे त्यांनी सांगितले. पवारांच्या आदेशानंतर काही वेळातच एक अधिकारी माझे विसरलेले सामान घेऊन आमच्याकडे धावत आला.

शरद पवार हे इतके मोठे नेते असूनही त्यांचे जमिनीवर पाय आहेत हे मी आज अनुभवले. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी त्यांना लगेच समजतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: