वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या आजपासून मुलाखती, विधानसभेची तयारी सुरू

यंदा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता

मुंबई | लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी केली जात आहे. पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील पक्षांमध्ये हालचाली सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचे वृत्त आहे. 288 जागांसाठी इच्छुक उमेदवारांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वाढली आहे.


288 जागांची तयारी करत असलेल्या वंचित आघाडीमुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहेत. काँग्रेसला याअगोदर वंचितने 40 जागांची ऑफर देऊ केली होती. यामुळे आघाडीत येण्याबाबतचे स्पष्ट संकेत वंचित आघाडीने या अगोदरच दिले आहेत.


विदर्भातील इच्छुक उमेदवारांसाठी 13, 14 आणि 15 जुलैला मुलाखती होणार आहेत. 13 जुलैला नागपूर, 14 जुलै अमरावती आणि 15 जुलैला अकोला, वाशीम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्येदेखील मुलाखती होणार आहेत, तर औरंगाबादमध्ये मराठवाड्यासाठीच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: